Water Level : ईशान्य भारतातील भूजल पातळी घटतेय!

ईशान्य भारतात भूजल पातळी खालावत असून २००२ त २०२१ या दोन दशकांत भूगर्भातील सुमारे ४५० घन कि.मी. पाणी गमाविल्याचे नव्या अहवालातून समोर आले आहे.
Water Level Decrease
Water Level Decreasesakal

नवी दिल्ली - ईशान्य भारतात भूजल पातळी खालावत असून २००२ त २०२१ या दोन दशकांत भूगर्भातील सुमारे ४५० घन कि.मी. पाणी गमाविल्याचे नव्या अहवालातून समोर आले आहे. भारतातील सर्वांत मोठे धरण असलेल्या इंदिरा सागर धरणाच्या पूर्ण क्षमतेपेक्षा हे पाणी ३७ पट आहे, असे आयआयटी गांधीनगरमधील संशोधक विमल मिश्रा यांनी सांगितले. ते स्थापत्य अभियांत्रिकी व पृथ्वी विज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत.

संशोधकांच्या पथकात हैदराबादेतील राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेतील संशोधकांचाही समावेश होता. संशोधकांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत तसेच उपग्रहाचा डेटा आणि मॉडेलच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. ईशान्य भारतात मॉन्सूनच्या कालावधीतील पाऊस १९५१ ते २०२१ दरम्यान ८.५ टक्क्यांनी घटल्याचेही त्यांना आढळले. याच काळात हिवाळ्यातील तापमानात मात्र ०.३ अंश सेल्सिअसने वाढ झाली.

संशोधक मिश्रा म्हणाले, की हवामान बदलाने मॉन्सूनचा पाऊस घटत असून हिवाळ्यातील तापमानही वाढत आहे. त्यामुळे, भूजल पुनर्भरणात सहा ते बारा टक्क्यांची घट अपेक्षित आहे. भूजल पुनर्भरण होण्यासाठी रिमझिम किंवा सौम्य पाऊस अनेक दिवस पडण्याची गरज असते.

मात्र, हवामान बदलामुळे अतिवृष्टीसारख्या तीव्र घटनांच्या रूपात पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, भूजलाचे पुनर्भरण होऊ शकत नाही. भूजल पातळी खालावण्याचा कल यापुढेही सुरू राहू शकतो. तसेच खरीप व रब्बी हंगामात पिकांसाठी पाण्याचा उपसा केल्याचाही भूजल पातळीवर परिणाम होतो, असेही त्यांनी सांगितले.

पाऊस वाढल्याने आपल्या पाण्याच्या सर्व समस्या सुटतील, या गृहितकाला आमच्या संशोधनाने आव्हान दिले आहे. उत्तर भारतात तापमान सरासरीपेक्षा एक ते तीन अंशांनी वाढल्याने भूजल पुनर्भरणात सात ते दहा टक्क्यांनी घट होऊ शकते.

- विमल मिश्रा, संशोधक

सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढणार

तापमानवाढीचा कल असाच राहिल्यास मॉन्सूनच्या पावसात १० ते १५ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता असून हिवाळा एक ते पाच अंश सेल्सिअसने ऊबदार होऊ शकते. त्यामुळे, सिंचनाच्या पाण्याची मागणी सहा ते वीस टक्क्यांनी वाढू शकते, असाही दावा करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com