
Nirmala Sitharaman : जीएसटी परिषदेच्या बैठकीत कराबाबत मोठा निर्णय; काय म्हणाल्या अर्थमंत्री?
नवी दिल्लीः जीएसटी परिषदेची ४८वी बैठक आज संपन्न झाली. यामध्ये कराबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला असून त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. १ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार असून त्यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली.
हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जीएसटी कायद्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. या कायद्यांतर्गत गुन्हेगारीला आळा घालणे, अपिलीय न्यायाधिकरणाची स्थापना, पान मसाला-गुटख्याच्या व्यवसायात करचोरी रोखण्यासाठी काम करणे; या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले.
आजच्या बैठीकमध्ये कोणत्याही वस्तूवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. जैवइंधनावरील जीएसटी ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे. विमा कंपन्यांसाठी नो क्लेम बोनसवर जीएसटी लागू होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या बैठकीमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.