GST : डिसेंबर महिन्यात दीड लाख कोटी जीएसटी कर संकलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GST tax collection in crore December revenue govt delhi income

GST : डिसेंबर महिन्यात दीड लाख कोटी जीएसटी कर संकलन

नवी दिल्ली : डिसेंबर महिन्यात देशाचे जीएसटी करसंकलन दीड लाख कोटी रुपये झाले असून नोव्हेंबर पेक्षा त्यात अडीच टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील जीएसटी कर संकलनापेक्षा या डिसेंबरमधील रक्कम १५.२ टक्के जास्त आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आज ही आकडेवारी प्रसिद्धीस दिली आहे. डिसेंबर २०२१ मधील ही रक्कम १.३० लाख कोटी रुपये होती तर नोव्हेंबर २०२२ मधील ही रक्कम १.४६ लाख कोटी रुपये होती. गेल्या सलग दहा महिन्यांमध्ये देशाचे जीएसटी कर संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे.

डिसेंबर मध्ये केंद्रीय जीएसटी ची रक्कम २६,७११कोटी तर राज्य जीएसटीची रक्कम ३३,३५७ कोटी रुपये होती. एकात्मिक जीएसटी ची रक्कम ७८,४२४ कोटी रुपये होती, तर उपकर अकरा हजार पाच कोटी रुपये होता. एकात्मिक जीएसटी पैकी केंद्र सरकारच्या वाट्याला ३६ हजार ६६९ कोटी रुपये तर राज्य सरकारांच्या वाट्याला ३१ हजार ९४ कोटी रुपये गेले.

डिसेंबर महिन्यात हिमाचल प्रदेश, पंजाब, मणिपूर, आसाम, ओरिसा, छत्तीसगड, दमण आणि दीव गोवा, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, तेलंगणा या राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या जीएसटी संकलनामधील वाढ १४ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

नोव्हेंबर महिन्यात फक्त आठ राज्यांचे जीएसटी कर संकलन ऑक्टोबर घ्या आकडेवारी घ्या १४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले होते. डिसेंबर महिन्यात फक्त ११ राज्यांच्या कर संकलनातील वाढ नोव्हेंबर मधील आकडेवारीच्या १४ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

टॅग्स :FinanceArthavishwaGST