Ahmedabad Hawala racket News
Ahmedabad Hawala racket NewsSakal

Ahmedabad News: ५४० डमी बँक खाती, ऑनलाईन बेटिंग ते दुबई कनेक्शन; गुजरातमध्ये १८०० कोटींचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त

देशातल्या आणि दुबईतल्या वेगवेगळ्या बुकींच्या वतीने हे रॅकेट चालू होतं.
Published on

Ahmedabad News: अहमदाबादच्या गुन्हे प्रतिबंध शाखेने शनिवारी केलेल्या छापेमारीमध्ये १८०० कोटींचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. हे रॅकेट क्रिकेट बेटींग आणि डब्बा ट्रेडिंगच्या संदर्भातलं असून माधवपुरा भागात आढळून आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या शहरातलेच चौघे जण हे रॅकेट चालवत होते. देशातले आणि दुबईतल्या वेगवेगळ्या बुकींच्या वतीने हे रॅकेट चालू होतं. २०२१ पासून हे रॅकेट चालू होतं. त्यांनी वेगवेगळ्या नावांनी डमी बँक खातीही उघडली होती, तसंच व्यवहारांसाठी बनावट कंपन्याही उभारल्या होत्या.

Ahmedabad Hawala racket News
Pune Crime: महिलांनी मारलं म्हणून अपमान झाला अन् "त्याने" खाणीत उडी मारून दिला जीव

माधवपुरा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, हर्शित जैन नावाची एक व्यक्ती महावीर इंटरप्रायझेस या ऑफिसमधून ऑनलाईन बेटिंग आणि डब्बा ट्रेडिंग करत होता. त्याच्याकडे जवळपास ५४० बनावट बँक खाती होती. जैन आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत वेगवेगळ्या क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावायचा आणि जिकलेले पैसे या बनावट बँक खात्यांमधून दुबईक़डे वळवण्यात येत होते.

पोलिसांनी काही जणांचे सिमकार्ड्स आणि अनेकांची कागदपत्रंही सापडली आहेत. पोलिसांनी जितेंद्र हिरागार, सतिश परिहार, अंकित गेहलोत, निरव पटेल अशा चार जणांना पकडलं आहे. हे चौघेही हर्शित जैनसाठी काम करायचे. पोलिसांनी १९३ सिमकार्ड्स, ५३६ चेकबुक्स, ७ मोबाईल, ३ लॅपटॉप्स, ५३८ डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स आणि विविध बनावट कंपन्यांचे ८३ शिक्के जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com