आणखी एक कट उधळला; बोटीतून गुजरातमध्ये घुसलेल्या 8 पाकिस्तानींना पकडले

समुद्राच्या मार्गे गुजरातमधून भारतीय सीमेमध्ये घुसू पाहणाऱ्या 8 पाकिस्तानी नागरिकांना पडकडण्यात आले आहे. 30 किलोची हिरोइन घेऊन नूह नावाच्या बोटीने 8 पाकिस्तानी भारतीय सीमेमध्ये आले होते
Indian Coast Guard
Indian Coast Guardsource ani

नवी दिल्ली- समुद्राच्या मार्गे गुजरातमधून भारतीय सीमेमध्ये घुसू पाहणाऱ्या 8 पाकिस्तानी नागरिकांना पडकडण्यात आले आहे. 30 किलोची हिरोइन घेऊन नूह नावाच्या बोटीने 8 पाकिस्तानी भारतीय सीमेमध्ये आले होते. पाकिस्तानी लोकांना गुजरात आणि इंडियन कोस्ट गार्डने 14 ताखेच्या रात्री कच्छच्या जखाऊजवळ ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 150 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताला ड्रग्जच्या माध्यमातून उद्धवस्त करण्याचा डाव पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून खेळत आहे. कधी ड्रोनच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर, पंजाबमध्ये ड्रग्ज पाठवले जाते. कधी समुद्रमार्गे गुजरातमध्ये ड्रग्ज पाठवले जाते. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

भारतीय कोस्ट गार्डने सांगितलं की, गुजरात दहशतवादविरोधी पथकासोबत (एटीएस) मिळून ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात जखाऊ किनाऱ्याजवळ मासे पकडणाऱ्या एका बोटीला घेरण्यात आले. त्यात 8 पाकिस्तानी होते. बोटीची झडती घेतल्यानंतर त्यात 30 किलोग्रम हिरोईन सापडली आहे.

आयसीजीने ट्विटरवर सांगितलं की, आयसीजीने एटीएस गुजरातसोबत एका संयुक्त अभियानांतर्गत भारतीय समुद्री क्षेत्रात आयएमबीएम (आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा रेषा) जवळ जखाऊ किनाऱ्याजवळ पाकिस्तानी बोट पीएफबी (पाकिस्तानी फिशिंग बोट) पकडण्यात आली. यात 8 पाकिस्तानी नागरिक प्रवासी होते आणि त्यांच्याजवळ 30 किलो हिरोईन सापडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com