गुजरात, अंदमान सर्वाधिक ‘स्टार्टअप’स्नेही

वृत्तसंस्था
Sunday, 13 September 2020

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘द स्टेट्स स्टार्टअप रँकिंग अहवाल २०१९’ प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्टार्टअप कंपन्यांचा आढावा घेण्यात आला आहे. याआधी २०१८ मध्ये असा अहवाल प्रसिद्ध झाला होता. स्टार्टअप कंपन्या उभारणीस प्रोत्साहन मिळेल असे वातावरण तयार करण्यात गुजरातनंतर कर्नाटक आणि केरळ राज्यांचा क्रमांक लागतो.

कर्नाटक, केरळ आणि चंडीगड यांचेही यश
नवी दिल्ली - स्टार्टअपस्नेही वातावरण निर्माण करण्यात देशात गुजरातने अव्वल क्रमांक पटकाविला आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या वर्गवारीत अंदमान आणि निकोबार बेटांनी पहिले स्थान मिळवले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘द स्टेट्स स्टार्टअप रँकिंग अहवाल २०१९’ प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्टार्टअप कंपन्यांचा आढावा घेण्यात आला आहे. याआधी २०१८ मध्ये असा अहवाल प्रसिद्ध झाला होता. स्टार्टअप कंपन्या उभारणीस प्रोत्साहन मिळेल असे वातावरण तयार करण्यात गुजरातनंतर कर्नाटक आणि केरळ राज्यांचा क्रमांक लागतो. तर, केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंडीगडने दुसरा क्रमांक पटकावला आहे. क्रमवारी ठरवताना ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि अनुभव यांना ७६ टक्के महत्त्व देण्यात आले होते.

सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेला रवाना; राहुल गांधीसुद्धा सोबत

क्रमवारी ठरवताना एकसमानता असावी आणि या प्रक्रियेचे प्रमाणीकरण व्हावे यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे दोन  गट पाडण्यात आले होते. दिल्ली आणि आसाम वगळता, सर्व केंद्रशासित प्रदेश आणि ईशान्येकडील राज्ये ‘वाय’ वर्गवारीत, तर इतर सर्व राज्ये आणि दिल्ली ‘एक्स’ वर्गवारीत टाकण्यात आली होती.

केंद्र सरकारने आणले शेती बळकावण्याचे अध्यादेश; कॉंग्रेसचा आरोप

स्टार्टअप अहवालाबाबत
राज्याराज्यांत परस्पर सहकार्याची भावना वाढीस लागून धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्यास पाठबळ मिळावे हा या अहवालाचा हेतू आहे. अहवाल आराखड्यात सात विस्तृत क्षेत्रांचा समावेश असून, त्यात ३० कृतिशील प्रमाणे ठरवण्यात आली होती. यामध्ये संस्थात्मक पाठबळ, मंजुरीची सुलभ प्रक्रिया, सार्वजनिक खरेदीसाठी नियमांची शिथिलता, प्राथमिक टप्प्यात सहकार्य, बीजनिधी पुरवठा, प्रसिद्धी अशा प्रमाणांचा समावेश होता. 

स्टार्टअपस्नेही वातावरणाच्या दिशेने
आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, तमिळनाडू, उत्तर प्रदेश

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat Andaman most startup friendly