

Jethabhai Bharwad
ESakal
गुजरात विधानसभेचे उपाध्यक्ष जेठाभाई भारवाड यांनी गुरुवारी (२५ डिसेंबर) "व्यस्त वेळापत्रक" आणि इतर जबाबदाऱ्यांचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्य सरकारने एका प्रसिद्धीपत्रकात याची घोषणा केली. भारवाड यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि प्रदेश भाजप अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांच्यासमवेत गांधीनगर येथील विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्या अधिकृत निवासस्थानी आपला राजीनामा सादर केला, असे त्यात म्हटले आहे.