Gujarat Assembly Election 2022: : जडेजाची बायको गुजरात विधानसभा लढवणार; तिकीट झाले पक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Election

Gujarat Assembly Election 2022: : जडेजाची बायको गुजरात विधानसभा लढवणार; तिकीट झाले पक्के

पुढच्या महिन्यात गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची बायको रिवाबा जाडेजा ही देखील निवडणुकीच्या रिंगणार उतरली आहे. नुकतीच, भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान, जडेजाची पत्नी रीवाबा हिचे तिकीट पक्के केले आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिला जामनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. (Gujarat Assembly Election 2022 cricketer Ravindra Jadeja wife fielded from Jamnagar North by BJP )

रिवाबाने 2019 साली भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी तिने जामनगर उत्तरमधून तिकीट मागितल्याची चर्चा होती. सध्या इथून भाजपाचेच धर्मेंद्रसिंह जाडेजा आमदार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. मागच्या अनेक वर्षांपासून इथे भाजपाची सत्ता आहे. भाजपा यावेळी सुद्धा आपला गड कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

2017 गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने 99 आणि काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम आदमी पार्टीच्या प्रवेशामुळे भाजपा, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.