Gujarat Election : पहिल्या टप्प्यात १६७ डागाळलेले उमेदवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat assembly election

Gujarat Election : पहिल्या टप्प्यात १६७ डागाळलेले उमेदवार

अहमदाबाद : गुजरातची विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. पैकी १६७ उमेदवारांविरोधात गुन्हे आहेत. १०० उमेदवारांवर खून, बलात्कासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा माहिती ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफार्मस(एडीआर) संस्थेने दिली.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांची संख्या आम आदमी पक्षात (आप) सर्वाधिक आहे. ‘आप’ने तिकीट दिलेल्या ८८ उमेदवारांपैकी ३२ (३६ टक्के) उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यापैकी ३० टक्के जणांचे नाव खून, बलात्कार, अपहरण, अत्याचार आदी गंभीर अपराधांत नोंदविले आहे.

‘आप’नंतर काँग्रेसमधील ३५ टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आहेत. यातील २० टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. पहिल्या टप्प्यात काँग्रेस ८९ जागा लढवित असून त्यांचे ३१ उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. गुजरातमधील सत्ताधारी भाजपने सर्व ८९ जागांवर उमेदवार उभे केले. या पक्षाचे १४ उमेदवारांवर गुन्ह्े आहेत.

गुन्ह्यांची नोंद असलेले पक्षनिहाय उमेदवार (पहिला टप्पा)

  • ३२ - आम आदमी पक्ष

  • ३१ - काँग्रेस

  • १४ - भाजप

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या लोकांना सर्वच पक्षांनी उमेदवारी दिली आहे.अशा उमेदवारांची निवड करण्यामागील त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेले उत्तर विनोदी आहे. उदा. उमेदवारावर खुनाचा गुन्हा नोंदलेला असेल तर पक्षाचे म्हणणे असते की त्याचे सामाजिक काम चांगले आहे आणि आम्हाला अन्य कोणताही योग्य उमेदवार आढळला नाही.

- अनिल वर्मा, प्रमुख, एडीआर