Gujarat : भाजपनं पाच मंत्र्यांसह 38 आमदारांचं कापलं तिकिट; मोरबी पूल दुर्घटनेतील आमदाराचाही समावेश

पक्षानं मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना घाटलोधिया मतदारसंघातून उमेदवारी दिलीय.
Gujarat Assembly Election 2022
Gujarat Assembly Election 2022esakal
Summary

पक्षानं मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना घाटलोधिया मतदारसंघातून उमेदवारी दिलीय.

गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election 2022) भाजपनं (BJP) ज्या 38 विद्यमान आमदारांना तिकीट दिलेलं नाही, यात राज्यातील पाच मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपनं गुरुवारी जाहीर केलेल्या 160 उमेदवारांच्या यादीत मोरबीचे आमदार आणि राज्यमंत्री ब्रिजेश मेरजा यांचं नाव नाहीये. विशेष म्हणजे, मोरबी इथं गेल्या महिन्यात पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला होता.

2012 आणि 2017 मध्ये कच्छ जिल्ह्यातील भुज मतदारसंघातून विजयी झालेल्या गुजरात विधानसभेच्या अध्यक्षा नीमाबेन आचार्य यांनाही पक्षानं तिकीट दिलेलं नाहीये. पक्षानं मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांना घाटलोधिया मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. शिवाय, अनेक विद्यमान आमदारांनाही तिकीट देण्यात आलंय.

Gujarat Assembly Election 2022
Narendra Modi : मोदीजींची लोकप्रियता भाजपसाठी 'ट्रम्प कार्ड', निवडणुकीत होणार फायदा - CM धामी

सध्याच्या मंत्रिमंडळातील संसदीय व विधिमंडळ कार्यमंत्री राजेंद्र त्रिवेदी, सामाजिक न्याय मंत्री प्रदीप परमार, कामगार राज्यमंत्री ब्रिजेश मेरजा, परिवहन राज्यमंत्री अरविंद रयानी आणि मंत्री आर सी मकवाना यांना तिकिट दिलेलं नाहीये. राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी महत्त्वाचं महसूल खातंही काढून घेण्यात आलंय. यावेळी ज्या 38 भाजप आमदारांना तिकीट दिलं गेलं नाही, यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि 2017 ते 2021 या काळात त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या सात आमदारांचा समावेश आहे.

Gujarat Assembly Election 2022
कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com