Amit Shah : गुजरात निवडणुकीपासून ते समान नागरी कायद्यापर्यंत..; अमित शाहांनी मांडले 10 खास मुद्दे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah Gujarat Election

'आम्ही सर्व निवडणुकांचे रेकॉर्ड मोडू आणि प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करू.'

Amit Shah : गुजरात निवडणुकीपासून ते समान नागरी कायद्यापर्यंत..; अमित शाहांनी मांडले 10 खास मुद्दे

अहमदाबाद : गुजरात अधिवेशनात (Gujarat Convention) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मोठ-मोठे दावे केले आहेत. गुजरातमध्ये भाजप प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करेल, असं दावा त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलाय. अमित शाह म्हणाले, 'आम्ही सर्व निवडणुकांचं रेकॉर्ड मोडू आणि प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करू. आम्ही नेहमीच गुजरातमधील लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.'

यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये भाजप एकसंध असल्याचं स्पष्ट केलं. इथं कोणताही संघर्ष नाही. यासोबतच त्यांनी भाजप सरकारमध्ये भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हेच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केली.

  • गुजरातमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल. निवडणुकीतील सर्व रेकॉर्ड मोडीत काढून आम्ही प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करू. आम्ही नेहमीच गुजरातमधील लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

  • गुजरात निवडणुकीत (Gujarat Election) भाजपला किती जागा मिळतील? या प्रश्नावर गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'आमचं मताधिक्य नक्कीच वाढेल. जागाही वाढतील, प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन होईल. आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

  • 'देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क गरीब, दलित, आदिवासींचा असायला हवा. धार्मिक श्रद्धेच्या आधारावर देशाच्या साधनसंपत्तीवर कोणाचाही अधिकार नाही. कोणत्याही धर्मातील गरिबांना हक्क असलाच पाहिजे.

  • अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचं नामकरण सरदार पटेल यांच्या नावावर करण्याच्या काँग्रेसच्या निवडणूक आश्वासनावर अमित शहा म्हणाले, 'काँग्रेस खोटा प्रचार करत आहे. तिथं एक क्रीडा संकुल बांधण्यात आलं असून, त्याला सरदार पटेल क्रीडा स्टेडियम असं नाव देण्यात आलं आहे. इथं 18 स्टेडियम होणार असून त्यापैकी एका स्टेडियमला ​​पीएम मोदींचं नाव देण्यात आलं आहे.

  • केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, सरदार पटेल यांचं नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाहीये. सरदार पटेल यांचा सर्वात उंच पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बांधला. शेतकरी नेत्याचा जगातील सर्वात मोठा पुतळा बनवला, तिथं एकही काँग्रेसी पुष्पहार अर्पण करायला गेला नाही. हा पुतळा मोदींनी बनवला, म्हणून ते तिथं जात नाहीत.

  • 'काँग्रेसच्या राजवटीत घोटाळे मोजणे अवघड होते. आमच्या राज्यात घोटाळे शोधणे कठीण आहे. मोदीजींनी अशी व्यवस्था केलीय की, आता सुशासन चालू आहे.'

हेही वाचा: Rajiv Gandhi Case : इंदिरा, राजीव गांधींची हत्या झाली, तेव्हा आमचं कुटुंब..; काय म्हणाली दोषी नलिनी?

  • समान नागरी संहितेच्या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले, हे भाजपचं खूप जुनं वचन आहे. भाजपनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली आहेत. राममंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाकबाबत त्यांनी स्पष्ट सांगितलं.

  • जम्मू-काश्मीरबाबतच्या प्रश्नावर शाह म्हणाले, याआधी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्यांविरुद्ध कधीच कारवाई झाली नाही. पण, आता दहशतवाद करणाऱ्यांविरुद्ध आम्ही कठोर कारवाई केलीय.

हेही वाचा: Tipu Sultan : टिपू सुलतानचा पुतळा का बसवायचा नाही? काँग्रेसच्या बड्या नेत्यानं भाजपला चांगलंच सुनावलं

  • अमित शाहांनी पाकिस्तानच्या सीमेवरून होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत आमचं ड्रग्जविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण असल्याचं स्पष्ट केलं. पाकिस्तानचा धोका आम्ही सीमेच्या आत येऊ देणार नाही, असं ते म्हणाले.

  • हिमाचलमध्ये भाजप निश्चितपणे सरकार स्थापन करेल आणि जयराम ठाकूर मुख्यमंत्री होतील. यासोबतच आम्ही तेलंगणात चांगले निकाल आणू. ओडिशा आणि बंगालमध्ये चांगली सुधारणा होईल. बिहारमध्ये जागा वाढल्या, तर कामगिरीही चांगली होईल. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होईल, असंही अमित शाहांनी सांगितलं.