Gujarat Election: भाजपला गळती! आमदार सोळंकी यांचा 'आप'मध्ये प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal Narendra Modi

Gujarat Election: भाजपला गळती! आमदार सोळंकी यांचा 'आप'मध्ये प्रवेश

अहमदाबाद - गुजरातमध्ये आता विधानसभेचं तिकीटं न मिळाल्याने नाराज नेत्यांच्या पक्षांतराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील मातर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार केसरीसिंह सोळंकी यांनी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर गुरुवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. gujarat assembly news in Marathi

हेही वाचा: Jitendra Awhad Arrest: गोड गप्पांमध्ये गुंतवलं, अन्…; आव्हाडांनी सांगितला अटकेपूर्वीचा नाटकीय घटनाक्रम

'आप'चे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी ओबीसी नेते केसरीसिंग सोळंकी यांचे पक्षात स्वागत केले. एक ट्विट करून इटालिया यांनी ही घोषणा केली. 'आप'ने मात्र महिपतसिंग चौहान यांना मातर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

केसरीसिंह सोळंकी हे गुजरातमधील मातरचे भाजपचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वी दोन वेळा भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सोळंकी यांनी 2017 ची विधानसभा निवडणूक मातरमधून भाजपकडून लढवली होती.

सोळंकी यांनी २०१७ मध्ये काँग्रेसचे उमेदवार संजय पटेल यांचा २,४०६ मतांच्या फरकाने विजय मिळावला होता. सिंग हे अनेकदा त्यांच्या कामांवरून वादात राहतात. 2021 मध्ये पोलिसांनी सोळंकी यांना पावागढमध्ये दारू पार्टी आणि जुगार खेळताना पकडले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षाही सुनावली होती. तसेच चार हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता.