दोन दिवसांत काँग्रेसचे दोन आमदार भाजपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Elections two congress leader Mohan Singh Rathwa Bhagabhai Bard join bjp politics

दोन दिवसांत काँग्रेसचे दोन आमदार भाजपात

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला सलग दुसऱ्या दिवशी झटका बसला आहे. पक्षाचे भगाभाई बारड यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. गीर सोमनाथ जिल्ह्यातील तलाला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.काँग्रेसचे आमदार मोहनसिंह राठवा यांनी काल पक्षाचा राजीनामा दिला होता. बारड हे सौराष्ट्र आहिर समुदायाचे नेते आहेत. दिवंगत माजी खासदार जसाभाई बारड यांचे ते भाऊ आहेत.

त्यांचे कुटुंब काँग्रेसनिष्ठ म्हणून ओळखले जाते. बारड बंधूंचे वडील धानाभाई मांडाभाई बारड हेही काँग्रेसचे नेते होते. गुजरातमधील विधानसभा निवडणुकी आधीच विरोधी काँग्रेसला एकानंतर एक धक्के बसत आहे. आमदार मोहनसिंह राठवा यांनी काल पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राठवा दहावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सध्या ते गुजरातमधील छोटा उदयपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.