Video: राजकीय नेते काय करतीय सांगता येत नाही...

वृत्तसंस्था
Wednesday, 23 September 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यामुळे विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शिवाय, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंगा घेतल्या जातात. पण, एका राजकीय मिटिंग दरम्यान महिला नेत्याने कॅमेऱयावर आपले छायाचित्र लावून जाण्याचा प्रयत्न केला. पण, संबंधित घटनाच कॅमेऱयात कैद झाली.

मेक्सिको : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. यामुळे विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शिवाय, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंगा घेतल्या जातात. पण, एका राजकीय मिटिंग दरम्यान महिला नेत्याने कॅमेऱयावर आपले छायाचित्र लावून जाण्याचा प्रयत्न केला. पण, संबंधित घटनाच कॅमेऱयात कैद झाली. राजकीय नेते काय करतीय सांगता येत नाही, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

Video: सहा महिन्यांच्या मुलाने केला विश्व विक्रम!

कोरोनाचे महासंकट असल्यामुळे अनेक जणांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. कामासंदर्भात मीटिंग ही ऑनलाइन अॅपवर होते. राजकीय बैठकाही कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन घेतल्या जात आहेत. अशीच एक बैठक सुरू असताना धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत असताना एका महिला नेत्याने बैठकीतून पळ काढण्यासाठी एक शक्कल लढवली. ऑनलाइन बैठकीदरम्यान या महिला नेत्याने झूमवर आपले छायाचित्र लावून गायब होण्याचा प्रयत्न केला. यामुळे उपस्थितांना वाटेल की आपण मिटिंगमध्ये उपस्थित आहोत. पण, मीटिंगमधून उठून जातानाचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके ऐकून फुटला भावनांचा बांध

मेक्सिकोतील काँग्रेसच्या नेत्यांनी ही बैठक घेतली त्यावेळी हा प्रकार घडला आहे. व्हॅलेन्टिना बत्रे ग्वादरमा असे महिला नेत्याचे नाव आहे. मेक्सिकोच्या संसदेचे ऑनलाइन अधिवेशन होत होते. त्यावेळी अनेक नेते झूम व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्कात होते. यावेळी व्हॅलेन्टिना या देखील झूमवरून या ऑनलाइन सत्रात सहभागी झाल्या होत्या. यावेळी हा प्रकार घडला होता. या व्हिडीओमुळे त्यांची ही फसवणूक पकडली गेली आणि संसदेच्या ऑनलाइन सत्रात मोठी खळबळ उडाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women leader cheat in online zoom meeting video viral