दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुलमाजीदला अटक, गुजरात एटीएसची मोठी कारवाई

2dawood_20ibrahim.jpg
2dawood_20ibrahim.jpg

अहमदाबाद- गुजरात अँटी टेरर स्ववॉडला (एटीएस) मोठे यश मिळाले आहे. गुजरात एटीएसने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अत्यंत निकटच्या सहकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. दाऊदचा सहकारी अब्दुलमाजीद कुट्टीला गुजरात एटीएसने अटक केली आहे. अब्दुलमाजीद कुट्टीला झारखंडमधून अटक करण्यात आली आहे. मागील 24 वर्षांपासून अब्दुल माजीदचा शोध घेतला जात होता. 

माध्यमांना मिळालेल्या वृत्तानुसार, गुजरात एटीएसच्या एका पथकाने शनिवारी दाऊद इब्राहिमचा सहकारी अब्दुलमाजीद कुट्टीला झारखंडमधील जमशेदपूर येथून अटक केली. अब्दुलमाजीद कुट्टीने 1997 मध्ये प्रजासत्ताक दिनी गुजरात आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट करण्यासाठी स्फोटके पाठवली होती. पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दाऊद इब्राहिमने ही स्फोटके पाठवली होती. दाऊदसाठी अब्दुलमाजीद काम करत होता. 

पोलिसांनी सांगितले की, 1996 मध्ये अब्दुलमाजीदविरोधात सुमारे 106 पिस्तुल, 750 काडतुसे आणि सुमारे 4 किलो आरडीएक्स जमवल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी त्याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु, तो फरार झाला होता. 24 वर्षांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते. यापूर्वी त्याच्या एका सहकाऱ्याला अटक करण्यात आली होती. 

ओळख लपवून राहायचा
अब्दुलमाजीद कुट्टी आपली ओळख लपवून गेल्या अनेक वर्षांपासून झारखंडमध्ये राहत होता. सूत्रांच्या माध्यमातून गुजरात एटीएसच्या पथकाला त्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. अब्दुलमाजीदला अटक करणे हे गुजरात पोलिसांचे मोठे यश मानले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com