esakal | नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक? माजी IAS अधिकाऱ्याला केलं राष्ट्रीय अध्यक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

nitish kumar5

नितीश कुमार 2022 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहु शकले असते. पण, अचानक त्यांनी वेगळा निर्णय घेतला.

नितीश कुमारांचा मास्टर स्ट्रोक? माजी IAS अधिकाऱ्याला केलं राष्ट्रीय अध्यक्ष

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन

पाटणा- जनता दल यूनायटेडच्या (JDU) राष्ट्रीय अध्यक्षपदी रामचंद्र प्रसाद सिंह (RCP Singh)  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या आरसीपी सिंह राज्यसभा खासदार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, ज्याचे सर्वांनी समर्थन केले आहे. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांना राजकीय उत्तराधिकारी करण्याचं वक्तव्य केलं होतं. नितीश कुमार यांनी पाटणातील पक्षाच्या कार्यालयात नेते आणि कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत वक्तव्य केलं होतं की, त्यांच्यानंतर आरसीपी सिंह सर्वकाही पाहतील.  

राहुलजी हा काय चमत्कार झाला?; जेपी नड्डांनी व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

नितीश कुमारांनी रामचंद्र प्रसाद सिंह त्यांचे राजकीय उत्तराधिकारी असतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत. आरसीपी सिंह यांना जेडीयूमध्ये नितीश कुमारांनंतर दोन क्रमांकाचा नेता मानलं जातं. पक्षाच्या व्हर्चुअल बैठकांमध्ये नितीश कुमार यांच्याआधी आरसीपी सिंह भाषण द्यायचे. नितीश कुमार यांच्या निर्देशानुसार असं केलं जात होतं, असं सांगितलं जातंय.

निवडणुकीवेळी जागांची वाटणी असो किंवा उमेदवारांची निवड असो, यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आरसीपी सिंह यांच्यावर विश्वास दाखवतात. असे असले तरी मागील वर्षी झालेल्या रॅलीदरम्यान म्हणावे तेवढे कार्यकर्ते त्यांना गोळा करता आले नव्हते. आरसीपी सिंह दोन वेळेस राज्यसभा खासदार आहेत. ते 2010 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 2016 मध्ये नितीश कुमारांनी पुन्हा एकदा त्यांना संधी दिली होती. 

जाहिरातीमध्ये मराठी भाषेचा वापर करा, मनसेचा आता पश्चिम रेल्वेला इशारा

नितीश कुमारांनी सोडलं अक्ष्यक्षपद

नितीश कुमार 2022 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहु शकले असते. पण, अचानक त्यांनी वेगळा निर्णय घेतला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आरसीपी सिंह अध्यक्ष झाले असले तरी निर्णय नितीश कुमारच घेतील. त्यामुळे केवळ नावाला आरसीपी सिंह अध्यक्ष असतील. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आहे. त्यामुळे नितीश कुमार सावधानतेने पाऊल ठेवत आहेत. नितीश कुमार अध्यक्ष राहिले असते तर कोणता मोठा निर्णय घेतला तर मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते थेट उत्तरदायी ठरले असते. त्यामुळेच नितीश कुमार मास्टर स्ट्रोक खेळत असल्याची चर्चा आहे. 

loading image