Bank of India: कर्ज प्रकरणावरून 'बँक ऑफ इंडिया'च्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण, व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank of India

Bank of India: कर्ज प्रकरणावरून 'बँक ऑफ इंडिया'च्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण, व्हिडिओ व्हायरल

गुजरातमधील नडियादमध्ये बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बँक ऑफ इंडियाच्या नडियाद शाखेत एका ग्राहकाने कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.

दरम्यान 42 सेकंदाच्या या सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती बँकेत आल्याचे दिसत आहे. तो बँकेच्या आत बसलेल्या कर्मचाऱ्याकडे गेला आणि काहीही न बोलता त्याला मारहाण करू लागला. कर्मचाऱ्याला मारहाण होत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेले इतर कामगारही आले.

त्यानंतर त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरच बँक कर्मचाऱ्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून व्यक्तीला तेथून बाहेर काढलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना ३ फेब्रुवारी २०२३ रोजी घडल्याचे सांगितले जात आहे.

कर्जाच्या कारणावरू कर्मचाऱ्याला ग्राहकांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी नडियाद टाऊन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BankGujarat