Gujrat Drugs: गुजरातचं बनलंय ड्रग्जचं आगार! पुन्हा एकदा हजारो कोटी किंमतीचं 3,300 किलो ड्रग्ज जप्त

गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलानं ही संयुक्त कारवाई केली आहे. | Has Gujarat become a haven for drugs? Once again 3,300 kg of drugs worth thousands of crores seized
Gujrat Porbandar Drugs
Gujrat Porbandar Drugs Esakal

पोरबंदर : गुजरातचा समुद्र किनारा हा ड्रग्जचं आगार झाल्याची परिस्थिती आहे. कारण इथं पुन्हा एकदा मोठा ड्रग्जचा साठा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं पकडला आहे. ३,३०० किलो वजनाचं हजारो कोटींचं हे ड्रग्ज आहे. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलानं ही संयुक्त कारवाई केली आहे. (gujarat become a hub for drugs once again 3300 kg of drugs worth thousands of crores

इराणी आणि पाकिस्तानी क्रू मेंम्बर्सना अटक

एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या पोरबंदर इथं एक मोठी संयुक्त कारवाई केली आहे. यामध्ये एका जहाजातून गुजरातच्या किनाऱ्यावर आणण्यात येत असलेलं 3300 किलो पेक्षा जास्त ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी 5 क्रूना अटक करण्यात आली आहे. जे इराणी आणि पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत हजारो कोटी रुपये आहे. (Marathi Tajya Batmya)

३,३०० किलोहून अधिक ड्रग्जचा साठा

या जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये 3,089 किलो चरस, 158 किलो मेथॅम्फेटामाइन 25 किलो मॉर्फिनचा समावेश आहे. सुमारे 3,300 किलोहून अधिक वजनाचा हा ड्रग्जचा साठा समुद्रमार्गे घेऊन जाणारा एक कंटेनर पोलिसांनी पकडला. (Latest Marathi News)

Gujrat Porbandar Drugs
CAA Notification: ‘सीएए’ मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात शक्य? आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अंमलबजावणीचा केंद्राचा प्रयत्न

विमानानं दिले होते इनपूट

P8I LRMR विमानाच्या इनपुटच्या आधारे, भारतीय तटरक्षक दलानं तस्करीत गुंतलेल्या संशयास्पद जहाजाला थांबवलं. एटीएस, NCB आणि नौदलाची ही सर्वात मोठी संयुक्त कारवाई ठरली आहे. पकडलेल्या बोटी आणि चालक दलासह जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज हे भारतीय बंदरात कायदा अंमलबजावणी एजन्सीकडं सुपूर्द करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com