esakal | चंद्रकांत पाटील गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

चंद्रकांत पाटील गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक नेत्यांची नावं सध्या चर्चेत आलेली आहेत. सध्या गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला देखील मुख्यमंत्र्यांची शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे या चर्चेत एक मराठमोळं नाव आघाडीवर आहे. सध्या गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव नव्या मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी? कोणती नावे आहेत चर्चेत?

त्यांनी म्हटलंय की, विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे, साहजिकच माध्यमांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी सध्या अनेक नावांची चर्चा आहे. त्यामध्ये माझंही नाव चर्चेत आहे. मात्र, मी या व्हीडिओच्या माध्यमातून स्पष्ट करु इच्छितो की, मी या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. पुढे त्यांनी म्हटलंय की, विजय रुपाणी तसेच गुजरातचे जे बनतील त्या नव्या मुख्यमंत्र्यांसमवेत आम्ही 182 जागांपैकी 182 जागा जिंकण्याचा एकत्रितपणे प्रयत्न करु. तसेच पक्षाला अधिक बळकटी कशी आणता येईल, यासाठीच कृतीशील राहू.

हेही वाचा: उत्तर प्रदेशात भाजपचा मोठा विजय निश्चित - नड्डा

आज मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली आणि त्यांनी आपला राजीना सोपवला आहे. रुपाणी यांनी या राजीनाम्यामागचे नेमके कारण स्पष्ट केलेलं नाहीये. मात्र गुजरात काँग्रेसचे विजय रुपाणी यांना भारतीय जनता पक्षाचे अपयश लपवण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आला असल्याची टीका केली आहे. रुपाणी यांच्या रुपाने गेल्या काही दिवसात भाजपच्या तिसऱ्या मुख्यमंत्र्यांचा असा तडकाफडकी राजीनामा झाला आहे.

loading image
go to top