Gujarat BJP Ministers Resign : मोदींच्या गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड! मुख्यमंत्री सोडून भाजपच्या सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा

Gujarat all ministers resign News : जाणून घ्या, सर्वच मंत्र्यांनी राजीनामा का दिलाय आणि गुजरातमध्ये नेमकं काय घडणार आहे?
All BJP ministers in Gujarat submit their resignations, leaving the Chief Minister as the only remaining member of the state cabinet amid major political turmoil.

All BJP ministers in Gujarat submit their resignations, leaving the Chief Minister as the only remaining member of the state cabinet amid major political turmoil.

esakal

Updated on

Mass Resignation in Gujarat BJP Cabinet : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी भाजप सरकारमधील सर्व १६ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड होणार हे निश्चत झाले आहे.

तर प्राप्त माहितीनुसार गुजरातमधील भाजप सरकार त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. तर, नवीन गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा शुक्रवारी दुपारी होणार आहे. पीटीआयने एका वरिष्ठ भाजप नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार गुजरातला शुक्रवारी सुमारे दहा नवीन मंत्री मिळू शकतात.

गुजरातमधील सध्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह १७ मंत्री होते. यामध्ये आठ कॅबिनेट-स्तरीय मंत्री आहेत, तर तेवढीच संख्या राज्यमंत्र्यांचीही आहे. एकूण १८२ सदस्य असलेल्या राज्य विधानसभेत २७ मंत्री असू शकतात, जे सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्के आहेत.

All BJP ministers in Gujarat submit their resignations, leaving the Chief Minister as the only remaining member of the state cabinet amid major political turmoil.
Jawed Habib FIR News : सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब विरुद्ध तब्बल ३२ 'FIR' दाखल!

गुजरातमध्ये मंत्रीमंडळ विस्ताराबाबत घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस सुनील बन्सल गांधीनगरमध्ये दाखल झाले आहेत. राज्य सरचिटणीस रत्नाकर आणि राष्ट्रीय संघटन सरचिटणीस यांच्यात गांधीनगरमध्ये बैठक झाली. तर मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईहून गांधीनगरला परतले आहेत. बहुतेक आमदारही आमदार निवासात पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com