
गुजरातमध्ये वडोदरा जिल्ह्यात महीसागर नदीवर असलेला गंभीरा पूल कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत दोन ट्रक आणि दोन कार नदीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. आता या घटनेनंतरचा पुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महीसागर नदीवरचा हा पूल ४५ वर्षे जुना असल्याचं सांगितलं जात आहे.