गुजरातमध्ये 60 फूट लांब पूल कोसळला; गाड्या अडकल्या

वृत्तसंस्था
Monday, 7 October 2019

जुनागडचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जिल्ह्यातील मलांका गावाजवळील पूल कोसळला. यामुळे काही वाहने पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकली.

अहमदाबाद : गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने 60 फूट लांब पूल कोसळला आहे. यामुळे अनेक गाड्या अडकल्या असून, चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.

जुनागडचे जिल्हाधिकारी सौरभ पारधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जिल्ह्यातील मलांका गावाजवळील पूल कोसळला. यामुळे काही वाहने पुलाच्या ढिगाऱ्याखाली अडकली. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसून, चार जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सासन आणि गीरला जोडणारा हा पूल असून, 40 वर्षांपूर्वी हा पूल उभारण्यात आला होता. यामुळे सासन आणि गीर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat bridge collapsed near Malanka village in Junagadh