Gujarat Ministry: मोदींच्या राज्यात नवे मंत्रिमंडळ! किती करोडपती किती गुन्हेगार जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 156 जागांवर विजय मिळवला आहे. यापैकी अनेकांवर गुन्हे दाखल आहेत.
Gujarat Cabinet ministers
Gujarat Cabinet ministersSakal

Gujarat Cabinet Minister: गुजरातच्या हल्लीच पार पडलेल्या निवडणुकांविषयी सांगायचं झालं तर भाजपने आपला 27 वर्षांचा गड राखलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा बालेकिल्ला असल्याने गुजरात जिंकणं हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय होता.

तसं तर परीक्षा तोंडावर आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करणाऱ्यांपैकी भाजप नसल्याने जोरदार प्रचार सभा, सुरुवातीपासूनचं नियोजन या बळावर भाजपने गुजरातमध्ये जवळपास 156 जागांवर विजय मिळवला.

आता गुजरातमध्ये नव्याने मंत्रिमंडळ स्थापन झालंय. पण यातल्या 17 पैकी 4 मंत्र्यांवर वेगवेगळ्या कारणांनी गुन्हे दाखल आहेत. तर नाही म्हटलं तरी 16 मंत्री कोट्याधीश आहेत. 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (ADR) च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह किमान 16 मंत्री कोट्यधीश असून त्यांची संपत्ती 1 कोटी किंवा त्याहून अधिक असल्याचं असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात म्हटलंय.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दणदणीत विजयानंतर नव्या मंत्रिमंडळाने सोमवारी शपथ घेतली.

एडीआरच्या अहवालानुसार, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री पुरुषोत्तम सोलंकी यांच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 420 अंतर्गत फसवणूक केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर कलम 467 अंतर्गत एक तर कलम 465 अंतर्गत फसवणुकीचा आरोप आहे.

Gujarat Cabinet ministers
Viral Photo : PM मोदींच्या मतदार संघातला हा फोटो का होतोय व्हायरल?

अहवालानुसार, हर्ष सांघवी, हृषिकेश पटेल आणि राघवजी पटेल या इतर तीन मंत्र्यांवरही कलम 188 अन्वये सार्वजनिक सेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत मानहानीचा किरकोळ आरोप आहे.

हा अहवाल आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांवर आधारित असल्याचं एडीआरने म्हटलंय.

या अहवालानुसार, बलवंत सिंग राजपूत हे सर्वाधिक संपत्ती असलेले मंत्री आहेत. त्यांच्याकडे 372.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर, बच्चूभाई खबाड यांच्याकडे सर्वात कमी म्हणजे 92.85 लाख रुपये इतकी संपत्ती आहे.

भाजपने गुजरातमध्ये जी मुसंडी मारलीय त्याने काँग्रेसचा विक्रमही मोडित काढलाय. 1985 मध्ये काँग्रेसने दीडशतकी जागा जिंकून इतिहास रचला होता. गेल्या 37 वर्षांत कुठल्याही पक्षाला 150 पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या नव्हत्या. अगदी मागची 27 वर्ष सत्तेवर असणाऱ्या भाजपलाही ते जमलं नव्हतं. पण यावेळी भाजपने सर्वच रेकॉर्ड ब्रेक केलेत.

Gujarat Cabinet ministers
भीमा-कोरेगाव प्रकरण : फादर स्टॅन स्वामींच्या कम्प्युटरमध्ये हॅकर्संनी टाकले कथित पुरावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com