esakal | महापौर ते मुख्यमंत्री! विजय रुपाणींची राजकिय कारकिर्द एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Rupani

महापौर ते मुख्यमंत्री! विजय रुपाणींची राजकिय कारकीर्द एका क्लिकवर

sakal_logo
By
सुधीर काकडे

गुजरातचे अध्यक्ष विजय रुपाणी यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गांधीनगरमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतल्यानंतर विजय रुपाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी विजय रुपाणी यांनी ‘आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत आहोत, यानंतर पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी आपण स्विकारु’ असे सांगितले. तसेच पक्षाने आपल्याला नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार देखील मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील त्यांनी आभार मानले.

विजय रुपाणी यांची राजकी कारकीर्द

सध्या म्यानमारमध्ये असलेल्या बुरमामध्ये २ ऑगस्ट १९५६ रोजी एका जैन कुटुंबात विजय रुपाणी यांचा जन्म झाला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षासोबत असलेल्या विजय रुपणी यांच्या राजकीय कारकिर्दीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश करत १९७१ मध्ये जन संघासोबत देखील काम सुरु केले. १९७६ साली आणीबाणीच्या काळात ११ महिने ते तुरुंगात होते. त्यानंतर १९८७ साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते. पुढे पहिल्यांदाच राजकोट शहराचे महापौर झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षातील वेगवेळ्या पदावर काम करत संघटनेच्या बळकटीकरणासाठी काम केलं.

हेही वाचा: ममतांविरोधात भाजपच्या प्रियांका टिब्रेवाल

२००६ ते २०१२ राज्यसभेचे खासदार

२००६ ते २०१२ या काळात विजय रुपाणी हे राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१४ मध्ये, जेव्हा गुजरात विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष वजूभाई वाला यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, तेव्हा विजय रुपाणी यांना भाजपने राजकोटमधील त्यांची रिक्त जागा लढवण्यासाठी उमेदवारी दिली. या संधीचं सोनं करत विजय रुपाणी यांनी १९ ऑक्टोबर २०१४ रोजी पोटनिवडणूकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. १९ फेब्रुवारी २०१६ ला विजय रुपाणी यांच्याकडे गुजरात भाजपच्या प्रदेश अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.

७ ऑगस्ट २०१६ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यानंतर विजय रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ७ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रूपदाची शपथ घेतली. सुमारे ५ वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळल्यानंतर आज ११ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी आपण राजीनामा देत असल्याची माहिती दिली.

loading image
go to top