esakal | आमच्या सरकारला कमी अनुभव, चुका झाल्या तरी लोक... - मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल
sakal

बोलून बातमी शोधा

आमच्या सरकारला कमी अनुभव, चुका होतील - गुजरातचे मुख्यमंत्री पटेल

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना आमच्या सरकारकडे अनुभव कमी असल्याचं वक्तव्य केलं.

आमच्या सरकारला कमी अनुभव, चुका होतील - गुजरातचे मुख्यमंत्री पटेल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना आमच्या सरकारकडे अनुभव कमी असल्याचं वक्तव्य केलं. कमी अनुभवामुळे आमच्याकडून चुक होऊ शकते, पण लोक आम्हाला सांभाळून घेतील असाही विश्वास यावेळी भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केला. कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभात भूपेंद्र पटेल बोलत होते. भाजपच्या यशाचे श्रेय कोणत्याही एका व्यक्तीला देता येणार नाही. हा सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांचा परिणाम असल्याचं त्यांनी म्हटलं.

भूपेंद्र पटेल म्हणाले की,'आमचं पूर्ण मंत्रिमंडळ नवीन आहे. त्यांच्यात उत्साह आहे, मला विश्वास आहे की आमच्या चुका झाल्या तरी तुम्ही आम्हाला फटकावणार नाही. तुम्ही आम्हाला काम कसं करायचं याची योग्य पद्धत सांगाल. आमच्या चुका सुधारण्यासाठी मदत कराल.'

हेही वाचा: Corona: दिवसाला पाच लाख रुग्ण हाताळण्याची क्षमता; सरकारचा छातीठोक दावा

गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी १३ सप्टेंबरला शपथ घेतली होती. विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली. रुपाणी यांनीच भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. गुजरातमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामध्ये भूपेंद्र पटेल यांच्या खांद्यावर पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची ओळख आहे.

loading image
go to top