Defamation case: राहुल गांधी राहणार गुजरात कोर्टात हजर; वाचा काय आहे प्रकरण

Rahul Gandhi
Rahul GandhiTeam eSakal

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि वायनाडमधून खासदार असलेले राहुल गांधी आज शुक्रवारी सूरतमधील जिल्हा न्यायालयात हजर राहणार आहेत. भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांच्याद्वारे राहुल गांधींविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यासंदर्भात आपली साक्ष देण्यासाठी राहुल गांधी आज हजर राहणार आहेत. याआधी 24 जून रोजी ते न्यायालयात हजर राहिलेले नव्हते.

Rahul Gandhi
शक्तिकांत दासच RBIचे गव्हर्नर; कॅबिनेटने तीन वर्षांसाठी वाढवला कार्यकाळ

काय आहे हे प्रकरण?

13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं, ज्या वक्तव्यावर आक्षेप घेत हा खटला दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी या सभेमध्ये म्हटलं होतं की, सगळ्या चोरांचं नाव मोदी का आहे? मग ते नीरव मोदी असो, ललित मोदी वा नरेंद्र मोदी असो! त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर पूर्णेश मोदी यांनी हरकत नोंदवत तक्रार दाखल केली होती.

Rahul Gandhi
गडचिरोली: सुरजागड खदानीविरोधातील आंदोलकांना अटक; एटापल्ली पोलिसांची कारवाई

याआधी ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान त्यांनी आपला गुन्हा मान्य करण्यास नकार दिला होता. राहुल गांधींचे वकिल किरीट पानवाला यांचं म्हणणं आहे की ते दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोर्टात हजर राहू शकतात.

राहुल गांधी यांनी प्रचारादरम्यान मोदी आडनाव असणारेच चोर का असतात? असं वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी याआधी देखील अनेकदा सुनावणी झाली आहे. सध्या पुर्णेश मोदी हे गुजरात सरकारमध्ये मंत्री आहेत. या प्रकरणी कोर्टाने मागच्या सुनावणीमध्ये तत्कालीन निवडणूक अधिकारी आणि भाषण रेकॉर्ड करणाऱ्या व्हिडीओ रेकॉर्डरची साक्ष नोंदवून घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com