Gujarat Dairy Farmers Protest : गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात दूध दरवाढीच्या मागणीसाठी सुरू झालेलं शेतकरी आंदोलन सोमवारी हिंसक वळणावर पोहोचलं. हिंमतनगर येथील साबर डेअरीच्या (Sabar Dairy Clash) प्रवेशद्वारावर आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये तुफान संघर्ष झाला, ज्यात तीन पोलिस जखमी झाले असून चार पोलिस वाहनांचे नुकसान झाले आहे.