Gujarat Election: गुजरात जिंकायला मोदींना मराठी माणूस कशाला लागतो? केजरीवालांनी डिवचलं

Gujarat Election
Gujarat Electionesakal
Updated on

Gujarat Election 2022 : अरविंद केजरीवालांनी गुजरातेत मोदींना एका वेगळ्या मुद्द्यावरून डिवचलंय. गुजरात जिंकण्यासाठी मोदींना मराठी माणूस कशाला लागतो? हा कळीचा मुद्दा अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

तर विषय आहे चंद्रकांत पाटील यांचा. तुम्ही म्हणाल, आपल्या चंद्रकांत दादांच गुजरातेत काय काम? नाही हे आहेत गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील. चला जाणून घेऊ सीआर पाटील आहेत कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? गुजरातच्या राजकारणात ते इतक्या केंद्रस्थानी कसे आले? ते भाजप ला गुजरात जिंकून देतील का?

यांचं पूर्ण नाव चंद्रकांत रघुनाथ पाटील. जन्म 16 मार्च 1955. महाराष्ट्रातील जळगाव येथे जन्म झाला. इथे एक ट्विस्ट आहे. सी.आर. पाटील यांचा जन्म झाला तेव्हा गुजरात नावाचं कोणतंही राज्य नव्हतं. गुजरात-महाराष्ट्र तेव्हा एकच प्रदेश होता. त्यांच्या वडिलांना पोलिसात नोकरी लागली. त्याामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब सुरतला स्थायिक झालं. त्यानंतर त्यांनी सुरतमधूनच पुढील शिक्षण घेतले. आयटीआयमधील डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. याच काळात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

सी.आर. पाटील वडिलांच्या जागी 1975 मध्ये पोलिसात रुजू झाले. 1984 मध्ये त्यांनी पोलिसांची युनियन स्थापण्याचा प्रयत्न केला. बड्या पोलिस अधिकाऱ्यांना ते पटलं नाही. त्यामुळे त्यांना पोलिसातून निलंबित करण्यात आलं. 1989 मध्ये अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींच्या मार्गदर्शनात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सन 2009 मध्ये ते भाजपच्या तिकीटावर नवसारी मतदारसंघांतून पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा नवसारीची जागा मोठ्या मताधिक्याने जिंकली. 2019 मध्ये ते सलग तिसऱ्यांदा खासदार झाले. याहून मोठी गोष्ट म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पाटील वाराणसीत पंतप्रधान मोदींसाठीही काम करत होते. पक्षाने त्यांना बनारसमध्ये निवडणूक समन्वयक म्हणून काम दिलं होतं.

बनारस मधील काम सांभाळतानाच त्यांनी नवसारी मतदारसंघ सुद्धा जिंकला. नरेंद्र मोदी यांनी त्यांना गुजरात प्रदेशाध्यक्ष करणं मोठी गोष्ट आहे. गुजरातच्या कोणत्याच जातीय समीकरणात ते बसत नसताना नॉन गुजराती व्यक्तीला मोठी संधी मिळाली. त्यांची लोकप्रियता आणि काम करण्याची क्षमता पाहता भाजप हायकमांडने त्यांना भाजपचं प्रदेशाध्यक्ष बनवलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये पोटनिवडणूक जिंकली होती. आता पाटील पुन्हा एकदा गुजरातेत गुजरातमध्ये भाजपसाठी सत्ता खेचून आणू शकतात का, हे पाहावं लागेल.

- कुणाल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com