Gujarat Election Result 2022: मुस्लिमबहुल भागातही भाजपची मोठी झेप! जिंकल्या 19 पैकी 17 जागा

MIMसह इतर पक्षही 'या' जागांवर विजयी फरकाच्या जवळपास पोहोचले नाहीत. पण भाजपचा झाला सहज विजय
Gujarat Elections Result
Gujarat Elections Resultesakal

Gujarat Election Result 2022 : गुजरातमधील विधानसभेच्या 19 पैकी 17 जागांवर भाजपनं विजय मिळवला असून तिथं मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी एकाही जागेवर भाजपनं मुस्लिम उमेदवार उभा केलेला नसतानाही हे घडलं आहे.

जमालपूर-खाडिया आणि वडगाम या १९ पैकी उर्वरित २ जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. क्विंटनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Gujarat Election Result 2022 Big leap of BJP even in Muslim majority areas)

Gujarat Elections Result
PM Modi : "भाजपच्या प्रयत्नांमुळं भारतात गरीबी कमी होतेय"; PM मोदींनी दिला तज्ज्ञांचा हवाला

यांपैकी अनेक ठिकाणी अनेक मुस्लिम उमेदवार होते यांपैकी अनेक अपक्ष म्हणून उभे होते. उदाहरणार्थ, लिंबायतच्या जागेवर एकूण 44 उमेदवार होते त्यांपैकी 36 मुस्लिम उमेदवार आहेत. इथं भाजपच्या संगीताबेन राजेंद्र पाटील 52 टक्क्यांहून अधिक मतं मिळवून विजयी झाल्या आहेत. या जागेवर आम आदमी पार्टी (आप) अवघ्या 20 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिली आहे.

Gujarat Elections Result
HP Election Results 2022: नड्डांच्या होमपीचवर भाजपनं गमावली सत्ता! काय आहेत कारणं?

केवळ एकच मुस्लिम उमेदवार विधानसभेत

काँग्रेसच्या इम्रान खेडावाला या केवळ एकाच मुस्लिम उमेदवारानं गुजरात विधानसभेत प्रवेश मिळवला आहे. 2017 मध्ये, खेडवाला व्यतिरिक्त इतर दोन मुस्लिम उमेदवार आमदार बनले होते. वांकानेरमध्ये एमए पिरजादा आणि दरियापूरमध्ये ग्यासुद्दीन शेख हे दोघाचा यावेळी पराभव झाला. गुजरातमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 9 टक्के मुस्लिम आहेत.

परंतू राज्यात त्यांचे प्रतिनिधित्व कमी असल्याचा इतिहास आहे. 1998 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपनं शेवटच्या वेळी मुस्लिम उमेदवार उभा केला होता. MIMच्या उमेदवारांनी लक्षणीय मुस्लिम लोकसंख्या असलेल्या 19 पैकी 13 जागांवर निवडणूक लढवली, परंतू त्यांना यश मिळालं नाही.

बिल्किस बानोचा आक्रोश

2002 च्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींची सुटका हा निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. काँग्रेसचे राहुल गांधी, ज्यांनी गुजरातमध्ये मर्यादित प्रचार केला, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर 'महिलांची फसवणूक' केल्याबद्दल टीका केली होती. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रचारात हा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. तथापि, हा मुद्दा स्पष्टपणे भाजपचा एकही मतदार कमी करण्यात अपयशी ठरला.

Gujarat Elections Result
Gujarat Election Result 2022: "भाजपच्या विक्रमाला विजयाची नवी झालर"; CM शिंदेंनी केलं तोंडभरुन कौतुक

नोव्हेंबर 2022 मध्ये निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2002च्या दंगलीतील गुन्हेगारांना 'धडा शिकवला' असे वादग्रस्त विधान केले होते. यानंतर भाजप नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “हिंदू सहसा दंगलीत सहभाग घेत नाहीत"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com