Gujrat Election Result: गुजरात विधानसभेचा निकाल कधी, कुठे, कसा पाहू शकता? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujrat Election

Gujrat Election Result: गुजरात विधानसभेचा निकाल कधी, कुठे, कसा पाहू शकता? जाणून घ्या

Gujarat Assembly Election 2022 election Result: गेल्या 27 वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. ही निवडणुक दोन टप्प्यात पार पडाली आहे. 1 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार तर 5 डिसेंबरला दुसरा टप्पा पार पडला. आणि यादोन्ही टप्प्यांचा निकाल 8 डिसेंबर म्हणजे उद्या जाहीर केला जाणार आहे. पहिल्या टप्यात 89 जागांसाठी मतदान पार पडलं. (Gujarat Assembly Election 2022 election Result)

हेही वाचा: maharashtra: राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा; धक्कादायक माहिती समोर

तर दुसऱ्या टप्यात 93 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. एकूण 182 जागांवर निवडणूक पार पडली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एबीपी सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार, गुजरातमध्ये भाजपाला 128 ते 140 जागा, काँग्रेसला 31 ते 43 जागा आणि आम आदमी पार्टीला 3 ते 11 जागा मिळू शकतात. या पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा भाजप सरकार येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics: अखेर मुख्यमंत्री शिंदेंच्या पोटातलं आलं ओठावर? 'त्या' वाक्याने चर्चेला उधाण

गुजरात निवडणूक तिहेरी झाल्याची पाहिला मिळाली होती. अनेक वर्षे भाजप विरूद्ध काँग्रेस अशी निवडणूक होत होती मात्र या वेळी गुजरातमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील गुजरातमध्ये भाजपला तगडं आव्हान दिलं होतं. गुजरातमध्ये या तिन्ही पक्षांनी घोषणांचा पाऊस पाडला. त्यांमुळे गुजरातमध्ये भाजप सत्ता राखण्यात यशस्वी ठरणार की, काँग्रेस आपला करिश्मा दाखवणार हे उद्याच कळेल. उद्या सकाळी ७ वाजल्या पासून मतमोजणी सुरू होणार आहे.

गुजरात निवडणूकीचा LIVE निकाल उद्या ७ वाजल्या पासून 'सकाळच्या वेब साईट'वर पाहू शकता.