Amit Shah: बंडखोरांशी प्रेमाने, आपुलकीने बोला; गुजरात निवडणुकीत अमित शहांची 'गांधीगिरी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Elections Amit Shah

Amit Shah: बंडखोरांशी प्रेमाने, आपुलकीने बोला; गुजरात निवडणुकीत अमित शहांची 'गांधीगिरी'

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर पक्षाच्या एका विद्यमान आमदारासह चार माजी आमदारांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची धमकी दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्र्यांना बंडखोरांशी प्रेमाने, आपुलकीने बोलण्याचा सल्ला दिला आहे. (Gujarat Elections 2022 disgruntled BJP leaders Amit Shah suggestion )

गुजरातमध्ये सलग 27 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी किमान चार बंडखोरांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऐकले नाही. आता अमित शहा हे गृहराज्य गुजरातमध्ये असल्याने, त्यांनी रविवारपासून राज्यातील सर्वोच्च नेत्यांसोबत सामंजस्य योजनेवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. ही बैठक तब्बल पाच तास चालल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीदरम्यान, शहा यांनी नेत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ' बंडखोरांविरोधात आक्रमक भूमिका मांडण्यापेक्षा त्यांच्याशी प्रेमाने आणि अपुलकिने वागा. त्यांच्याबाबत नकारात्मक वक्तव्य करु नका. खोरांशी सौजन्याने वागा. अशा सूचना शहांनी आपल्या नेत्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

तसेच, जे लोक नाराज आहेत. ते भाजप परिवाराचे बऱ्याच वर्षापासून सदस्य राहिले आहेत. त्यामुळं ते नाराज झाले असतील तर त्यांच्याशी समोर बसून चर्चा करा. त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करु नका. असा सल्लाही शहा यांनी यावेळी दिला.

हिमाचल प्रदेशातही भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागला. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 68 पैकी 21 जागांवर बंडखोर होते. याचीच धास्ती भाजपने घेतली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

टॅग्स :GujaratAmit Shah