Gujarat: गुजरातला अच्छे दिन! निवडणूकीच्या तोंडावर मोठी कर कपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat: गुजरातला अच्छे दिन! निवडणूकीच्या तोंडावर मोठी कर कपात

Gujarat: गुजरातला अच्छे दिन! निवडणूकीच्या तोंडावर मोठी कर कपात

CNG PNG Price: गुजरातमधील जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी सीएनजी आणि पीएनजीवरील कर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुजरातचे मंत्री जितू वाघानी यांनी ही घोषित केली आहे. राज्य सरकारने पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) वरील व्हॅटमध्ये 10 टक्के कपात केली आहे.

कपातीनंतर आता गुजरातमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी होणार आहेत. अहमदाबादमध्ये सध्या CNG ची किंमत 83.9 रुपये आहे, तर गांधीनगरमध्ये 82.16 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. त्याचप्रमाणे, गांधीनगरमध्ये सीएनजी ₹ 82.16 प्रति किलो दराने विकला जात आहे. सीएनजीमध्ये कर कपात केल्यानंतर, ग्राहकांना प्रति किलो ₹ 6 ते 7 चा फायदा मिळू शकतो.

PNG ची किंमत प्रति किलो ₹ 5 ते 6 ने कमी होऊ शकते. येत्या काही दिवसांत गुजरातमध्ये निवडणूक आहे. यापूर्वी हा दिलासा देण्यात आला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप गुजरातच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. तर हिमाचल प्रदेशातील मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

टॅग्स :Gujarat