Asaram Bapu Case: आसाराम यांच्या बायको आणि मुलीलाही होणार शिक्षा? गुजरात उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

Asaram Bapu Rape Case: गुजरात उच्च न्यायालयाने २०१३मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेल्या बाबा आसाराम यांच्या बायको, मुलगी आणि तीन महिला शिष्यांना नोटीस बजावली आहे.
Asaram Bapu Spouse
Asaram Bapu Spouse sakal

Asaram Bapu Case 2013: गुजरात उच्च न्यायालयाने २०१३मध्ये बलात्काराच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावलेल्या बाबा आसाराम यांच्या बायको, मुलगी आणि तीन महिला शिष्यांना नोटिस बजावली आहे. या महिलांची आधी मुक्तता करण्यात आली होती, तसेच आसाराम यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती हसमुख सुथार यांच्या विभागीय बेंचने आसाराम यांची बायको लक्ष्मीबेन आणि मुलगी भारतीबेन यांच्यासह एकूण पाच महिलांना नोटिस पाठवली आहे. न्यायालयाने अपील दाखल करण्यात झालेल्या २९ दिवसांच्या उशीराची नोंद घेतली आणि बचावपक्षाला नोटिस बजावली.

Asaram Bapu Spouse
मोदी सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची बंगळूरमध्ये १७ तारखेला पार पडणार बैठक; शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष

गांधीनगरच्या एका न्यायालयाने २०१३मध्ये एका महिला शिष्याने दाखल केलेल्या बलात्काराच्या आरोपाखाली ३१ जानेवारी या दिवशी बाबा आसाराम यांना आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. महिला शिष्या पळून जाण्याआधी अहमदाबाद जवळील मोटेरा येथील आसाराम यांच्या आश्रमात २००१ ते २००७ या काळात अनेक वेळा बलात्कार करण्यात आला होता.

आसाराम यांची पत्नी लक्ष्मीबेन, मुलगी भारतीबेन आणि अन्य सहा शिष्यांवर गुन्ह्यात मदत करणे आणि प्रवृत्त करण्याचे आरोप होते. न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

Asaram Bapu Spouse
सोलापूर राष्ट्रवादी नेत्यांचे ‘वेट अँड वॉच’! कोठे, तौफिक शेखसह अन्य नेत्यांसमोर पेच; अजित पवार पुन्हा येण्याची आशा

राज्यातील कायदे विभागाने ६ मे २०२३ला फिर्यादी पक्षाला निर्दोष मुक्तता झालेल्यांविरोधात अपील दाखल करण्याचे निर्देश दिले होते. निर्दोष मुक्तता झालेल्या ६ लोकांपैकी ५ लोकांविरुद्ध अपील दाखल करण्यात आली आहे.

८१ वर्षीय आसाराम २०१३मध्ये त्यांच्या आश्रमातील अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि दुसऱ्या एका प्रकरणात जोधपूर. येथील कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

Asaram Bapu Spouse
Maharashtra Politics : अजित दादांसोबत असलेले आमदार मकरंद पाटील शरद पवारांच्या गाडीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com