
गुजरात उच्च न्यायालयाने ऑनलाइन सुनावणी दरम्यान अनुचित वर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला कठोर दंड ठोठावला आहे. सूरत येथील एका व्यक्तीने 20 जून रोजी झालेल्या ऑनलाइन सुनावणीला शौचालयात बसून उपस्थिती लावली होती. या असभ्य वर्तनामुळे न्यायमूर्ती ए.एस. सुपेहिया आणि न्यायमूर्ती आर.टी. वाछाणी यांच्या खंडपीठाने या व्यक्तीला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश दिला. यासोबतच, वरिष्ठ वकील भास्कर तन्ना यांनीही बिअरच्या मगमधून पेय घेत सुनावणीला उपस्थित राहिल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली.