

Gujarat ATS cracks deadly ISIS link, arrests doctor and accomplices
sakal
अहमदाबाद : डॉ. अहमद मोहीयुद्दीन सय्यद, आझाद सुलेमान शेख आणि मोहंमद सुहैल मोहंमद सलीम अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या तिघांनीही लखनौ, दिल्ली आणि अहमदाबाद येथे पाहणी केली होती, असे तपासातून निष्पन्न झाले आहे. डॉ. सय्यद हा वैद्यकशाखेतील उच्चविद्याविभूषित असून काही दिवसांपूर्वीच तो कट्टरपंथीयांच्या संपर्कात आला होता. मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी त्याने निधी संकलित करण्याबरोबरच काही हल्लेखारांनाही नेमण्याचा कट आखला होता, असे गुजरात ‘एटीएस’चे महासंचालक सुनील जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीने पाकिस्तानात त्याचे हस्तक असल्याची कबुली दिली असून पाकिस्तान सीमेवरून ड्रोनच्या माध्यमातून देशात शस्त्रे आणण्यात आल्याचे उघड झाले आहे.