Crime News: गुजरातमध्ये बीएसएफ जवानाचा निर्घृण खून; 'हल्ला नव्हे नियोजित हत्या!' पत्नीचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSF GUJARAT Crime News

Crime News: गुजरातमध्ये बीएसएफ जवानाचा निर्घृण खून; 'हल्ला नव्हे नियोजित हत्या!' पत्नीचा आरोप

नवी दिल्लीः गुजरातच्या खेडामध्ये एका तरुणाने बीएसएफ जवानाच्या मुलीचा व्हीडिओ बनवून व्हायरल केला होता. त्यानंतर बीएसएफ जवान सदरील तरुणाला जाब विचारण्यासाठी त्याचा घरी गेले. मात्र तिथे काहीतरी भलतंच घडलं.(Latest Crime News)

तिथे असलेल्या सात लोकांनी मिळून काठ्या आणि धारदार शस्त्राने जवानावर हल्ला केला. या घटनेत जवानाचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी त्या सात हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. ज्या बीएसएफ जावनाचा मृत्यू झाला त्यांच्या घरामध्ये कमावणारं दुसरं कुणाीही नाही. कुटुंबामध्ये पत्नी, मुलगी आणि तीन मुलं आहेत. या घटनेनंतर जवानाच्या पत्नीने न्यायासाठी टाहो फोडला आहे.

पत्नी मंजुला बेन यांनी सांगितलं की, आम्ही जेव्हा आरोपींच्या घरी गेलो तेव्हा तिथे ७ लोक होते. त्यांनी आमच्यावर लाठ्या-काठ्या आणि फावड्याने हल्ला केला. मलादेखील मारहाण केली.

'हा हल्ला पूर्ण प्लॅनिंगने झाला होता. तिथे नंतर ३० ते ३५ लोक आले. त्यांनीही आमच्यावर हल्ला केला. कुणीही आमची मदत केली नाही' असं मंजुला बेन यांनी सांगितलं.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

गुजरात बीएसएफच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना दुर्दैवी आहे. बीएसएफ ५६व्या बटालियनचे मुख्य संरक्षक मेलजी भाई सुट्टीवर होते. यादरम्यान त्यांची हत्या झाली. याप्रकरणी बीएसएफ आणि पोलिस सोबत काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :GujaratBSF