Vasuki Indicus : भारतात होते डायनासोरपेक्षा अजस्त्र साप; गुजरातेत सापडलेल्या जीवाश्मांचे गूढ उलगडले

Kutch Snake Fossils : या महाकाय सापांची लांबी साधारणपणे ११ ते १५ मीटर (५० फूट) एवढी असावी आणि त्यांचे वजन मात्र एक टनांपर्यंत असेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
Vasuki Indicus
Vasuki IndicuseSakal

Largest Snake Fossil found in India : आपल्या पृथ्वीतलावर कधीकाळी ‘टी-रेक्स’ या महाकाय डायनोसॉरप्रमाणेच महासर्पांचा देखील मुक्त वावर होता. पुराणांमध्ये समुद्रमंथनावेळी ‘वासुकी’ या नागाचा संदर्भ सापडतो. आतापर्यंत याकडे केवळ पुराण कल्पना म्हणूनच पाहिले जात असे पण प्रत्यक्षात तसे महासर्प याच पृथ्वीवर अस्तित्वात होते असे संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केले आहे.

आयआयटी रूरकी येथील शास्त्रज्ञांनी २००५ मध्ये गुजरातमध्ये उत्खनन करत एका महाकाय सरीसृप सजीवाच्या मणक्याचे जीवाश्म शोधून काढले होते, ते जीवाश्म एका महाकाय सर्पाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. या जीवाश्मांचा आकार पाहून अभ्यासकांनी त्याला ‘वासुकी’ (Vasuki Indicus) असे नाव दिले आहे. या ताज्या संशोधनामुळे वासुकी कुळातील अन्य सरीसृप प्राण्यांची निर्मिती आणि त्यांच्या उत्क्रांतीचा क्रम जाणून घेता येईल असे अभ्यासकांनी म्हटले आहे. अभ्यासकांनी सापाच्या २७ मणक्यांचे अवशेष शोधून काढले आहेत. या कुळातील काही सापांचा आकार हा अजगराएवढा महाकाय होता पण ते फारसे विषारी नव्हते असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. (Largest Snake Ever lived on Earth)

वजन एक टनापर्यंत

या महाकाय सापांची लांबी साधारणपणे ११ ते १५ मीटर (५० फूट) एवढी असावी आणि त्यांचे वजन मात्र एक टनांपर्यंत असेल असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. सायंटिफिक रिपोर्ट’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वासुकी आकाराने मोठा असल्याने अॅनाकोंडा आणि अजगराप्रमाणे ते हळूहळू शिकार करत असे. (Snakes Larger than T--Rex)

Vasuki Indicus
Scientists Talk To Whale : शास्त्रज्ञांनी चक्क व्हेलशी मारल्या गप्पा; आता एलियन्सशी संवाद साधताना होणार संशोधनाचा फायदा

पृथ्वीवर त्याकाळी आतापेक्षा अधिक तापमान असण्याची शक्यता आहे त्यामुळे या सापांचे दलदलीच्या प्रदेशामध्ये वास्तव्य असले पाहिजे. या जीवाश्माचा मोठा आकार पाहूनच त्याला आम्ही ‘वासुकी’ असे नाव दिले .

- देवजित दत्त, संशोधक आयआयटी रूरकी

‘तितानोबा’शी तुलना

साधारणपणे साठ कोटी वर्षांपूर्वी कोलंबियामध्ये वास्तव्यास असलेल्या तितानोबा (Titanoboa snake) कुळातील सापाएवढा या वासुकीचा आकार असला पाहिजे. त्याची लांबी देखील ४३ फूट एवढी होती तसेच वजन देखील एक टन एवढे होते. नुकत्याच सापडलेल्या सापाच्या जीवाश्माची केवळ त्याच्याशीच तुलना केली जाऊ शकते. आतापर्यंत आदिम काळी आशियामध्ये केवळ १० मीटरपर्यंत (३३ फूट) लांबी असलेल्या सापांचे अस्तित्व होते असे मानले जात असे. आज ज्या ठिकाणी हे जीवाश्म सापडले आहेत तो भाग शुष्क आणि धुळीने माखलेला असला तरीसुद्धा जेव्हा वासुकी प्रत्यक्षात अस्तित्वात होता तेव्हा मात्र तो भाग दलदलीचा असला पाहिजे असा कयास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com