आसारामच्या संस्थेला मंत्र्याने दिले अभिनंदनाचे पत्र

वृत्तसंस्था
बुधवार, 30 जानेवारी 2019

अहमदाबादः बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या शिक्षण संस्थेला गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी अभिनंदनाचे पत्र दिल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे.

अहमदाबादः बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या शिक्षण संस्थेला गुजरातचे शिक्षण मंत्री भुपेंद्रसिंह चुडासमा यांनी अभिनंदनाचे पत्र दिल्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाले आहे.

विविध देशांमध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाइन डे' अर्थात ‘प्रेम दिवस’ म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भारतातही हा दिवस आता ‘व्हॅलेटाइन डे’ म्हणून साजरा केला जात आहे. हिंदुत्ववादी संघटनांसह अनेकांचा याला विरोध आहे. त्यामध्ये आसारामच्या आश्रमचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याकडून 14 फेब्रुवारी हा दिवस मातृ-पितृ दिवस म्हणून साजरा केला जातो. गुजरातच्या शिक्षण मंत्र्यांनीही याला पाठींबा दर्शवला असून, अभिनंदनाचे पत्र दिले आहे. हे पत्र सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका केली आहे.

विविध ठिकाणांहून टीका होऊ लागल्यानंतर भुपेंद्रसिंह चुडासमा म्हणाले, 'हा छोटा विषय असून, याला जास्त महत्त्व देऊ नका.'

दरम्यान, 2013 मध्ये जोधपूर जवळील आसारामच्या आश्रमात एका उत्तर प्रदेशातील 16 वर्षीय मुलीवर बलात्कार व अत्याचाराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. शिवाय, महिला भक्तांना आशिर्वाद देण्याच्या नावाखाली तो छेडछाड करण्याबरोबरच शारिरिक सोषण करत असल्याचा आरोप आहे. जमिन हडपणे, मुलाच्या हत्येचाही आरोप आसाराम बापूवर आहे. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याच्यावर सुद्धा महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarat minister sends best wishes to rape convict Asaram for observing Matru Pitru Pujan day