

Ahmedabad student suicide
ESakal
गुजरातच्या अहमदाबादमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. २१ जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. कोईम्बतूरच्या १९ वर्षीय अनुकृत्नाच्या मृत्यूनंतर आता अहमदाबादमधील एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. नीट पुनर्परीक्षेच्या अवघ्या तीन दिवस आधी, त्या मुलाने तो राहत असलेल्या निवासी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली.