
CM Bhupendra Patel: उत्तराखंडनंतर गुजरातमध्येही समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंत्र पटेल आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी आणि कायदा बनवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचे अध्यक्षपद सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश रंजना देसाई यांच्याकडे सोपवण्यात आलंय. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितलं की, युसीसीच्या संबंधित समितीत ५ सदस्य असणार आहेत.