
गुजरातच्या बहुचर्चित गोध्रा कांडमधील प्रमुख आरोपीला तब्बल 19 वर्षांनी अटक करण्यात आली आहे.
अहमदाबाद : गुजरातच्या बहुचर्चित गोध्रा कांडमधील प्रमुख आरोपीला तब्बल 19 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लावण्यात आली होती. यातील मुख्य आरोपी रफीक हुसैन भटुकला गोधरा शहरातून अटक करण्यात आली आहे. ही घटना 19 वर्षांपूर्वी घडली होती, ज्यात 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. मुख्य आरोपीला अटक झाल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.
हेही वाचा - शंभरीच्या दिशेने पेट्रोलची घोडदौड सुरुच; सलग 8व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ
पंचमहल जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक लीना पाटील यांनी सांगितलं की, 51 वर्षीय भटुक आरोपांच्या मुख्य समुहाचा भाग होता आणि या कटामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. भटुक गेल्या 19 वर्षांपासून फरार होता. पाटील यांनी सांगितलं की, गुप्त सूचनेच्या आधारावर गोध्रा पोलिसांनी रविवारी रात्री रेल्वे स्टेशनच्या जवळ असणाऱ्या सिग्नल फलियाच्या घरावर छापा मारुन भटकला अटक करण्यात आले आहे. भटुक कट रचणाऱ्या आरोपींपैकी एक होता. त्याची यातील भूमिका महत्त्वाची होती. जमावाला उकसावणे आणि ट्रेनला जाळण्यासाठी पेट्रोलची व्यवस्था त्याने केली होती.
हत्या आणि दंगा भडकवल्याचा आरोप
तपास सुरु झाल्यानंतर नाव समोर आल्याने बटुक दिल्लीला पळून गेला होता. त्याच्याविरोधात हत्या, दंगल भडकवण्यासह अन्य आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, 27 फेब्रवारी 2002 मध्ये झालेल्या गोध्रा कांडमध्ये 59 कारसेवक मारले गेले होते. त्यानंतर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक दंगली उसळल्या होत्या. पोलिस अधिक्षकांनी म्हटलं की भटुक गोध्रा रेल्वे स्टेशनवर रोजंदारी करत होता. त्यांनी म्हटलं की, डब्यावर दगडफेक करणे आणि पेट्रोल ओतण्याचं काम त्यानं केलं होतं त्यानंतर इतर आरोपींनी आग लावली होती.