अहमदाबाद/सुरत : गुजरातमध्ये मान्सूनचा (Gujarat Monsoon) जोर वाढल्याने अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. विशेषतः सुरत शहर आणि जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत शहरात जवळपास ९ इंच पावसाची नोंद झाली आहे.