Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Umargam Records 1,064 mm Rainfall in 24 Hours: गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उमरगाम येथे अवघ्या २४ तासांत १,०६४ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे
Gujarat Rain Update

Gujarat Rain Update

esakal

Updated on

पुणे/वलसाड: गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उमरगाम येथे गुरुवारी गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक, तर नोंदींमधील तिसऱ्या क्रमांकाच्या विक्रमी पावसाची नोंद झाली. उमरगाम येथे गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत तब्बल १०६४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. याआधी पश्चिम किनारपट्टीवर मुंबईच्या सांताक्रूझ येथे २७ जुलै २००५ रोजी ९४४.२ मिलिमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com