Gujarat Assembly Election : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता; EC ची आज पत्रकार परिषद

निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतं.

Gujarat Vidhan Sabha Election 2022
Gujarat Vidhan Sabha Election 2022esakal
Summary

निवडणूक आयोग आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतं.

Gujarat Vidhan Sabha Election 2022 : निवडणूक आयोग आज (गुरुवार) 3 नोव्हेंबर 2022 रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकतं. यासाठी निवडणूक आयोगानं तयारी पूर्ण केलीय. गुजरातच्या निवडणुका गेल्या वर्षीप्रमाणं दोन टप्प्यात होणार आहेत.


Gujarat Vidhan Sabha Election 2022
UP : भ्रष्टाचारात अडकलेल्या DSP ला CM योगींचा दणका; पदावरुन हकालपट्टी करत बनवलं 'हवालदार'

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीची तारीख 8 डिसेंबर राहणार आहे. कारण, हिमाचल निवडणुकीच्या निकालाची तारीखही 8 डिसेंबर आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, निवडणूक आयोग आज (गुरुवार) दुपारी 12 वाजता गुजरात विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करेल. निवडणूक आयोगानं वेळापत्रक जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद बोलावलीय. निवडणूक आयोगानं या महिन्याच्या सुरुवातीला हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तारखांसह गुजरात निवडणुकीची घोषणा केली नव्हती. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


Gujarat Vidhan Sabha Election 2022
मोदींनी गुलामगिरी संपवली, काँग्रेस राहिली असती तर अयोध्येत राम मंदिर कधीच बनलं नसतं - CM योगी

निवडणूक आयोगानं हिमाचल प्रदेशच्या मतमोजणीची तारीख मतदानानंतर जवळपास एक महिन्यानंतर ठेवत गुजरातसाठीही मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होईल, असं स्पष्ट संकेत दिले होते. 2017 मध्ये देखील दोन्ही राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना निवडणुका जाहीर झाल्या होत्या, परंतु मतमोजणी एकाच वेळी 18 डिसेंबर रोजी झाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये 1998, 2007 आणि 2012 मध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या. 182 सदस्यीय गुजरात विधानसभेची मुदत 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com