हॉटेलचं बिल पाहून गुजराती पर्यटकांनी पळ काढला, गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली अन् फजिती झाली Video Viral

VIRAL VIDEO : हॉटेलमध्ये जेवणावर यथेच्छ ताव मारल्यानंतर ११ हजारांचं बिल पाहून ५ पर्यटक बिल न देताच पळून गेले. पण हॉटेल मालकानं पाठलाग करून त्यांना पकडलं आणि बिल वसूल केलं.
Tourists Try to Escape Without Paying Rs 11000 Hotel Bill Video Goes Viral

Tourists Try to Escape Without Paying Rs 11000 Hotel Bill Video Goes Viral

Esakal

Updated on

हॉटेलमध्ये पाच जणांनी पोटभरून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. बिल द्यायच्या वेळी प्रत्येकाने रेस्टरूम ब्रेकचा बहाणा करून हॉटेलबाहेर पळ काढला. बिल न देताच गाडीने तिथून निघून गेले पण पुढे जाऊन ट्राफिक जाममध्ये अडकल्यानं ते सापडले. शेवटी हॉटेल मालकाने बिलाचे पैसे त्यांच्याकडून वसूल केले. राजस्थानच्या माउंट अबू इथल्या सिवायामधील हॉटेलमध्ये ही घटना घडली. गुजरातमधून आलेल्या पाच पर्यटकांचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com