Gujarat Election Result 2022: जादूचे प्रयोग, फ्लॅश मॉब ते विकास का गरबा; भाजपाचा विजयाचा 'गुजरात पॅटर्न'

भाजपच्या गुजरातमधील प्रचाराच्या स्ट्रॅटजीवरील पडदा आता उघडला असून यामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलींचा समावेश आहे.
PM Modi_Gujarat Election
PM Modi_Gujarat Election

Gujarat Election Result 2022: गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं रेकॉर्डब्रेक विजय मिळवला आहे. त्यामुळं इथं भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीसोहळा कधी होईल याची घोषणाही भाजपनं केली आहे.

पण भाजपला इतकं घवघवीत यश मिळवून देण्यात भाजपची काय रणनीती होती. त्यांनी कुठले हटके कॅम्पेन राबवले जाणून घेऊयात. (Gujarat Assembly Election Result 2022 BJP unique Gujarat Pattern of Victory)

PM Modi_Gujarat Election
Gujarat Election 2022 Result : भाजपचं ठरलं! 'हा' नेता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; मोदी-शहांनी...

भाजपच्या हटके कॅम्पेनमुळेच काँग्रेस आणि आपचा सुफडा साफ करत त्यांना गुजरातमध्ये घवघवीत यश मिळालं. यामध्ये 'फ्लॅश मॉब्ज', 'मॅजिक शोज' तसेच 'स्मार्ट रथ' अशा भन्नाट निवडणूक प्रचारांचा समावेश होता. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या शेवटच्या टप्प्यातील सभांचाही मोठा वाटा आहे. डेक्कन हेरॉल्डनं याबाबत वृत्त दिलं आहे.

PM Modi_Gujarat Election
Gujarat Election Result 2022: गुजरातमधील हॉट सीट्सची काय आहे स्थिती?; पाहा प्रतिष्ठेच्या लढती

PM मोदींच्या मॅरेथॉन सभा

भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की, गुजरातमध्ये मोदींनी ३१ निवडणूक सभा घेतल्या. ज्या भागांमध्ये भाजपं कमजोर आहे त्याचं ठिकाणी पंतप्रधानांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये या सभा पार पडल्या. यामध्ये जनसभा आणि रोड शोजचा देखील समावेश होता. या सभांचं ध्येय अहमदाबादजवळच्या १६ मतदारसंघांपर्यंत पोहोचण्याचं होतं.

पेज कमिटीची महत्वाची भूमिका

गुजरातचे मीडिया सहप्रभारी झुबिन आशरम यांनी सांगितलं की, पक्षाच्या प्रचाराचं हृदय होतं पेज कमिटी. यासाठी पारंपारिक पन्ना प्रमुख सिस्टीम राबवण्याचं ठरलं होतं. यावेळी पन्नासाठी कमिटी स्थापन करण्यात आली होती.

यामध्ये मतदार यादीच्या प्रत्येक पानावर २० ते २५ नावांचा वापर करण्यात आला. याची पाच लोकांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. प्रत्येक पेज कमिटीकडं प्रत्येक कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीची भेट घेण्यास सांगण्यात आलं होतं.

या व्यक्तीवर नंतर भाजपला मतदान करण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अशा प्रकारे पेज कमिटींनी ८२ लाख कुटुंबांना भेट दिली. त्यानंतर प्रत्येक कुटुंबातून २-३ मतं निश्चित केली तर २ कोटी मत गोळा होतात, असंही अशरम यांनी सांगितलं. गुजरातमध्ये एकूण सुमारे ५ कोटी मतदार आहेत. ज्यांनी यावेळच्या मतदानासाठी नोंदणी केली होती.

जादूचे प्रयोग, फ्लॅश मॉब्ज, विकास का गरबानं आणली रंगत

याशिवाय शहरी आणि ग्रामीण भागांसाठी काही महत्वाचे उपक्रमही भाजपनं केले. यामध्ये जादूचे प्रयोग, पथनाट्य, लाईव्ह नाटकं, विकास का गरबा यांसारखे मजेशीर कॅम्पेनही राबवण्यात आले. यामध्ये ३५५६ ठिकाणी जादूचे प्रयोग, ३७०० ठिकाणी पथनाट्य, १४०० ठिकाणी नाटकं आणि विकास का गरबा झाले.

तर नागरी भागात राहणाऱ्या मतदारांसाठी १७०० ठिकाणी फ्लॅश मॉब्ज, १५० हून अधिक स्मार्ट रथ तर १८२ मतदारसंघातील १२०० हून अधिक ठिकाणी क्रिस क्रॉस्ड हे उपक्रम राबवण्यात आले. तसेच युथ विथ नमो या मुझिक बँडनं १४०० भागांमध्ये परफॉर्मन्स सादर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com