गुजरात : भाजप विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अगोदर जाहीर करणार नाही

भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये गेली २० वर्षे एकमेव मोदी हेच भाजपचे पोस्टर बॉय आहेत.
BJP
BJPsakal
Updated on
Summary

भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये गेली २० वर्षे एकमेव मोदी हेच भाजपचे पोस्टर बॉय आहेत.

नवी दिल्ली - गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमधे एकहाती सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अगोदर जाहीर न करण्याचे ठरविले आहे. साहजिकच नरेंद्र मोदी यांचे वलय, चेहरा व करिष्मा हाच भाजपचा निवडणूक आधार असण्याचा गेल्या २० वर्षांपासूनचा परिपाठ येथे चालूच रहाणार आहे.

भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या गुजरातमध्ये गेली २० वर्षे एकमेव मोदी हेच भाजपचे पोस्टर बॉय आहेत. त्यांच्या चेहऱयाशिवाय भाजप निवडणूक जिंकूच शकत नाही. ही भावना गुजरातमधील भाजपचे केडर व नेत्यांमध्ये उत्तरोत्तर दृढ होत गेली. आगामी निवडणूकही याला अपवाद नाही. यंदा गुजरात मध्ये काँग्रेस क्षीण अवस्थेत दिसत आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या आमम आदमी पक्षाने गुजरातमध्ये भाजपच्या समोर कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. केजरीवाल यांनी मोफत वीज, आदी घोषणांचा सपाटा लावला असून, आता तर भाजपचा आधार असलेल्या हिंदू मतपेढीतही वाटा घेण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. त्यातून त्यांनी, नोटांवर देवदेवतांच्या मूर्ती छापा असे म्हणण्यापर्यंत केजरीवाल यांनी वक्तव्ये केली आहेत. साहजिकच भाजप नेत्यांत काहीशी अस्वस्थता आहे. गुजरातमध्ये विजय रूपानी यांचा राजीनामा घेऊन मोदी-अमित शहा यांनी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनविले. मात्र पटेल यांचा कार्यकाळ अगदीच छोटा असल्याने त्यांच्या चेहऱयावर मते मिळतील यावर पक्षाचा विश्वास नाही.

गुजरात या स्वराज्यातील सत्ता हातून जाऊ न देण्यासाठी मोदी-शहा कोणत्याही स्थितीत प्रचंड प्रयत्नशील असतात. यंदाचा त्याला अपवाद नसेल. गुजरातच्या स्तता समीकरणांत पटेल- पाटीदार समाजाचा प्रचंड मोठा वाटा असतो. लोकसभेतील विजयासाठी ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशावर पकड असावी लागते त्याप्रमाणे गुजरातमध्ये जो पक्ष पाटीदार व आदिवासींचा पाठिंबा मिळवतो तो पक्ष सत्तेत येतो हा इतिहास आहे. २०१७ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलनामुळे भाजपला चांगलाच फटका बसला होता. भाजपचे गोडे ९९ जागांवरच अडल्याने मोदी-शहा संतप्त अवस्थेत गेले होते. त्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दीक पटेल यांना यंदा काँग्रेसपासून भाजपने ओढून घेतले, त्यामुळे भाजपला एक आधार मिळाला. त्यानंतरच्या पोटनिवडणुकांत भाजपने पुन्हा राज्यावर पकड बसविल्याचे दिसून आले. मात्र कोणतीही रिस्क नको, या भावनेतून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर न करण्याची भाजपची रणनीती आहे.

भाजपला जेथे विजयाची सर्वाधिक शक्यता असते तेथे हा पक्ष कायम मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करत आलेला आहे. मध्य प्रदेशात एकेकाळी सुंदरलाल पटवा व आता शिवराजसिंह चौहान, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, राजस्थानात वसुंधरा राजे ही याची ठळक उदाहरणे. मात्र गुजरातसारख्या राज्यांतही मुख्यमंत्परीदाचा चेहरा आधी जाहीर न केल्याने यंदा भाजप नेतृत्वाच्याच मनात सुस्पष्ट विजयाचा आत्मविश्वास काहीसा कमी आहे का, असा सवाल जाणकारांच्या मनात उपस्थित होत आहे.

गुंतवणुकीचा महापूर....!

भाजप नेतृत्वाने यापूर्वी १ लाख ५४ हजार कोटी रूपयांचा वेदात-फॉक्सकॉन उद्योगाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून काढून घेऊन मोदींच्या गृहराज्यात अलगद नेला होता. त्यापाठोपाठ आता टाटा उद्योगानेही आपल्या एका महाप्रकल्पासाठी गुजरातचीच निवड केली आहे. टाटा समूहारकडेच नवीन संसद भवनाचेही काम आहे. आता टाटा व एअरबस यांच्या २२ हजार कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी टाटांनी गुजरातचीच निवड केली आहे. या प्रकल्पात लष्करासाठी मालवाहक विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यातूनही गुजरातमध्ये रोजागाराच्या विपुल संधी निर्माण होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com