esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

drugs

Adani Port | ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करा - न्यायालयाचे निर्देश

sakal_logo
By
ओमकार वाबळे

अदानींच्या पोर्टवर ड्रग्ज सापडल्यानंतर गुजरात न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गुजरातमधील हे व्यापारी बंदर अदानी समूहामार्फत चालवण्यात येतं.

गुजरातमधील नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थांसाठीच्या विशेष न्यायालयाने महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) या प्रकरणात निर्देश दिले आहेत. गुजरातमधील मुंद्रा या बंदरावर २,९९० किलोंचा ड्रग्जसाठा जप्त करण्यात आला होता. त्याची अंदाजे किंमत २१ हजार कोटी सांगण्यात येत आहे. यानंतर अदानी समूहावर टीका होऊ लागली. मुंद्रा या बंदराचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे.

या ड्रग्जच्या आयातीतून अदानी समूहाला काही फायदा झाला आहे का, या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. १६ सप्टेंबरला डीआरआयने कारवाई करताना हे प्रकरण उघडकीस आले होते. अफगाणिस्तानातून इराणमार्गे मुंद्रा बंदरावर दोन कंटेनर उतरवण्यात आले. आंध्र प्रदेशातील विजयवाडाच्या आशी ट्रेडिंग कंपनीच्या नावे हे कंटेनर होते, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

loading image
go to top