गुजरात तापले, निवडणुकांवर अनिश्‍चिततेचे सावट

महेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 मार्च 2017

हवामान खात्याकडून "यलो वॉर्निंग', उष्माघाताचे प्रमाण वाढले

अहमदाबाद: गुजरातमध्ये अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला असून येथील पारा आता 42 ते 43 अंश सेल्सिअसवर पोचला आहे. स्थानिकांना उष्माघातास सामोरे जावे लागत असून, अतिसाराचे रुग्णही वाढले आहेत. पुढील दोन महिने उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने राज्यातील विधानसभा निवडणुकाही लवकर होण्याची कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हवामान खात्याने अनेक भागांमध्ये "यलो वॉर्निंग' जारी केली आहे. दुसरीकडे राज्यात कॉंग्रेस आणि भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी चालविली असून, प्रचाराची रणनीतीही आखण्यात आली आहे. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक लवकरच होणार असून या बैठकीमध्ये मुख्यमंत्री विजय रुपानी निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय घेतील.

राजस्थानात विक्रमी तापमान
राजस्थानच्या बारमेर शहरामध्ये तापमानाचा 71 वर्षांपूर्वीचा विक्रम तुटला असून येथे सोमवारी 44.4 अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. येथे 30 मार्च 1946 रोजी 43.3 अंश सेल्सिअस एवढे विक्रमी तापमान नोंदविल्या गेले होते. जोधपूर आणि जैसलमेरमध्येही उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात आणखी दोन तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून वाळवंटी प्रदेशातील थंडीमुळे लोकांना थोडासा दिलासा मिळू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Web Title: gujrat temperature and election