अमेरिकेत मॉलमध्ये बेछूट गोळीबारात 8 जण जखमी; हल्लेखोर फरार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

गोळीबाराची घटना घडताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. तरीही पोलिस हल्लेखोराला पकडू शकले नाही. जवळपास 75 पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. 

वॉशिंग्टन - अमेरिकेत पुन्हा एकदा बेछूट गोळीबाराची घटना घडली आहे. विस्कॉन्सिनमधील एका मॉलमध्ये शुक्रवारी हा गोळीबार झाला. यामध्ये 8 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. अद्याप या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेला असून सध्या पोलिस चौकशी करत आहेत. 

नगराध्यक्ष डेनिस मॅकब्राइड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी इथल्या मेफिल्ड शॉपिंग मॉलमध्ये अचानक गोळीबार सुरू झाला. त्यावेळी मॉलमध्ये असलेली लोकं घाबरून गेले. या गोळीबारात 8 जण जखमी झाले असून कोणाचा मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळीबाराची घटना घडताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. तरीही पोलिस हल्लेखोराला पकडू शकले नाही. जवळपास 75 पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जखमींना स्ट्रेचरवरून नेत असलेलं दिसत आहे. 

हे वाचा - ज्यूनिअर डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

याआधी अनेकदा अमेरिकेत गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. सप्टेंबर महिन्यातही असाच एका मॉलमध्ये गोळीबार झाला होता. इंडियाना मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यूही झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america wisconsin-myfair-mall-man gun firing several injured